'दिवाळी अंक २०२३ - सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धा'

दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेने महाराष्ट्रात सुजाण वाचक निर्माण करण्यासोबतच अनेक संपादक, साहित्यिक, चित्रकार, आणि व्यंगचित्रकारही घडविले. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवुन देण्यात दिवाळी अंकांचा वाटा निश्चितच मोलाचा आहे.
आपल्या कलेचा सुयोग्य वापर करून दिवाळी अंकांना देखणं रूप बहाल करणाऱ्या चित्रकार मंडळींचा योग्य सन्मान व्हावा या भावनेतुन 'अक्षरगंध' संस्थेने 'दिवाळी अंक २०२३ - सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धा' आयोजित केली आहे. कृपया आपल्या दिवाळी अंक - 2023 च्या 2 प्रती अक्षरगंधच्या खालील पत्त्यावर शुक्रवार दि. 24 नोव्हेंबर पर्यंत पाठविणे.
या स्पर्धेत सहभागी अंकामधून...
1. सर्वोत्तम मुखपृष्ठ
2. सर्वोत्तम अंक मांडणी (लेआऊट)
3. सर्वोत्कृष्ठ अंक
अशा तीन विभागातून प्रत्येकी 1 ते 3 विजेते निवडले जातील.
कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ५.०० ते ७.०० या वेळेत संपन्न होईल. ~ संकल्पना ~
ब्रँडबाँड निलेश B+
~ निमंत्रक ~
अक्षरगंध I प्रतिभा प्रकाशन I उगमक्रिएटिव्ह I उद्योगऊर्जा I EnGrow
_______________________
~ अंक पाठविण्याचा पत्ता ~
अक्षरगंध, C Wing, तळमजला, जय महालक्ष्मी अपार्टमेंट, बँक ऑफ बडोदा / रामकृष्ण बाजारच्या समोर, जोंधळे शाळेजवळ, जुनी डोंबिवली रस्ता, डोंबिवली (पश्चिम), जि. ठाणे, महाराष्ट्र. 431 201.
संपर्क - 9920 100 308 / 8879 230 443
कृपया ही पोस्ट आपल्या संपर्कातील अधिकाधिक साहित्यिक गटांमध्ये पाठवावी, ही विनंती. धन्यवाद🙏🙏
_______________________
विशेष सूचना - अपेक्षित सहभाग न मिळाल्यास 'दिवाळी अंक २०२३ - सर्वोत्तम मुखपृष्ठ स्पर्धा' पुढे ढकलण्याचे अथवा रद्द करण्याचे सर्वाधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.
_______________________
कै. बाळ बागवे स्मृती लघुकथा स्पर्धा - २०२३

पोस्टवर आपण लाईक कमेंट करून शेयर देखील करू शकता. धन्यवाद!