🙏
!!! *_सा विद्या या विमुक्तये_* !!!
*_नक्की असा कोणता क्षण होता ज्यावेळी मी *श्रीम् शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेस* *चालू* *करण्याविषयी निर्णय घेतला.??*
नमस्कार,
*_मी आरती चोरगे श्रीम् शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेस ची फाउंडर अंड ओनर.*
स्वतःची एक वेगळी ओळख असावी आणि आर्थिक स्वावलंबी व्हावं हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. माझंही होतं. अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर असा एक क्षण आला की नोकरी सोडून घरी बसावं लागलं .
सुरुवातीपासूनच माझा कल शेअर बाजाराकडे असल्यामुळे मी त्याच्यातच करिअर करण्याचं ठरवलं .जे मला शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला. घरच्या जबाबदाऱ्या प्रथमस्थानी होत्या.
स्वस्थ न बसण्याचा माझा स्वभाव असल्याकारणाने अजून काय करता येईल, यासाठी असंख्य बिजनेस मिटिंगला जेव्हा मी जायला लागले तेव्हा प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे असंख्य सुशिक्षित महिला अर्थार्जनासाठी, स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडताना मला दिसल्या.
माझ्यासारखचं काही कारणास्तव त्यांनाही नोकरी करणं शक्य नव्हतं.
दरम्यानच्या काळात ,शेअर्स मार्केट म्हणजे मार्केटींग वगैरे करावं लागतं असा गैरसमज पण अनुभवला . शेअर मार्केट विषयी कमालीची अनास्था, भिंती दिसली. न्यूनगंड त्यांच्यामध्ये होता.
मग हळू हळू मी माझ्या प्रेझेंटेशन मधे त्यांना पटवून देऊ लागले की शेअर बाजारातील कंपन्या आपल्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
या जगात अशक्य असे काहीही नाही मग शेअर मार्केट का नाही ?
आणि हे जेव्हा हळूहळू काम करायला लागलं ;काही महिलांना ते पटू लागल; मी पण शेअर मार्केट मधून रूपये कमवू शकते असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. काही महिलांना ज्याना या संधीची खरोखरीच गरज होती ती त्यांना मिळाली.
अलीकडच्या लॉकडाऊनच्या काळात शेअरबाजाराचा खूप फायदा लोकांना झाला. महिला ऑनलाईन शिकून शेअर मार्केट मधून रोजच्या रोज किंवा महिनाभराच उत्पन्न घेऊ लागल्या.
मला असं वाटतं की मूलभूत शेअर मार्केटची संकल्पना जर पटवून दिली तर या महिला त्यांचा ट्रेडिंग पॅटर्न ठरवून खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रगती करू शकतात. मला नेमकं हेच हवं होतं.
शेअर बाजाराविषयी बरेच क्लासेस, अकॅडमी उपलब्ध आहेत, पण महिलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत शेअर बाजार सांगणारं फार क्वचितच होतं.
*माझ्यासारख्या लेडीज ट्रेनर शेअर मार्केटमध्ये फारच कमी आहेत. म्हणून शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेस सुरू केले.*
एक महिला शेअर मार्केट शिकवणार म्हणून महिला सुद्धा येऊ लागल्या.
*अगदी नाशिक, बुलढाणा, रत्नागिरी, सावंतवाडी, चिपळूण येथून सुद्धा महिलांच्या इन्क्वायरी येऊ लागल्या. शेअर मार्केट क्लासेस महिलांसाठी चालू केल्याबद्दल धन्यवाद!आभार! शब्द अजून आत्मविश्वास वाढवून गेले. या महिलांनी दाखवलेला विश्वास अजून काहीतरी नवीन करू शकेन असा मला आत्मविश्वास वाटू लागला. हे समाधान खूप मोठं होतं..आहे...*
बदलत्या काळाबरोबर लोकांच्या नोकरी किंवा अर्थार्जनाचे मार्ग बदलले आहेत . वर्क फ्रॉम होम ची संकल्पना मूळ धरू पाहत आहे, अशा वेळी *शेअर मार्केट - एक सेकंडरी इन्कम सोर्स* होऊ शकतो.
*"थोडसं नॉलेज, थोडं स्किल थोडी हिंमत,थोडा वेळ आणि थोडीशी सुरुवातीला लागणारी गुंतवणूक , थोडं टेक्नॉलॉजीच ज्ञान वापरता आलं पाहिजे."*
हेच नेमकं महिलांना समजले आहे की आपला मोबाईल आपण जर कामाला लावला तर यातून खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रुपये कमवता येऊ शकतात.
*त्याच्यासाठी घराबाहेर जाऊन नोकरीच केली पाहिजे असं काही नाही.*
*माझ्याकडे ट्रेनिंग घेणाऱ्या मध्ये अगदी गृहिणी, नोकरदार वर्ग, व्यवसायिक, नोकरी करणाऱ्या महिला, रिटायर्ड, तरुण मुलींचा समावेश आहे.*
असंख्य रेफरन्सेस शेअर झाले , हा अतिशय चांगला अनुभव आहे .
*अजूनही *_श्रीम् शेअर मार्केट क्लासेस_* ऑनलाइन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू करण्याचा माझा मानस आहे.
*घराघरात शेअर मार्केट पोहोचले पाहिजे जेणेकरून प्रत्येक घरात एखादातरी शेअर मार्केट गुंतवणूकदार किंवा एखादा कंपनीचा मालक घडला पाहिजे.*
*असे मला वाटते...*
*धन्यवाद!!!* *
*आरती चोरगे*
*९९३०९२८१३७*
*श्रीम् शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासेस*