मित्रांनो, जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण प्रचंड उत्साहात असतो. त्यानंतर सुरु होतो तो संघर्ष. कधीकधी अस वाटते व्यवसाय बंद केलेलाच बरा. मला एक सांगावेसे वाटते की, आपण न लाजता रेफरंस मागायला हवा. कारण आपण व्यवसाय करत आहोत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहोत. रोजगारनिर्मिती करत आहोत. मग रेफरंस, मदत मागायला लाज वाटायचे काहीच कारण नाही. माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगतो, डॉ. विवेक बिंद्रा यांच्यासोबत काम करतांना एक-
एक व्यक्तीची मदत केली आहे परंतु कॉलेजची फारशी मदत करू शकलो नाही. एकही डील झाली नाही पण मी रेफरंस मागणे सोडले नाही आणि काही दिवसापूर्वी एका ऑफिसरने चक्क १३२ कॉलेजचे प्रिन्सिपल तसेच ट्रैनिंग व प्लेसमेंट ऑफिसर यांचा डेटाबेस दिला.(सोबत फोटो दिला आहे.) आता मी रोज साधारण १ कॉलेजला मार्गदर्शन करत असतो. रेफरंसमुळे कामाचा वेग वाढला आहे. तुमचा आशीर्वाद आहेच त्यामुळे नक्कीच साधारण ५००० ते १०,००० विद्यार्थ्यांची मदत करू शकतो, कॉलेजची मदत करू शकतो.
देशात जी शिक्षण क्रांती होत आहे. त्यासाठी भारतातील कुठलेही कॉलेज, आमदार, खासदार, मंत्री यांच्याशी तुमची ओळख असेल तर त्वरित माझ्याशी संपर्क साधा.
😊🤝🏻🇮🇳
अमित साळी
सामाजिक उद्योजक 9321492293
Superb post
अभिनंदन व शुभेच्छा....
उत्तम!!! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा🌷🌷