

आंबा महोत्सव २०२५
गोड आठवणींचा गोडवा!
"आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो..."
वरील गाणं ऐकताच डोळ्यांसमोर मोहक सुवास, गोडसर रस आणि उन्हाळ्यातील गारवा निर्माण करणारा 'आंबा' दिसतो. भारतात विशेषतः महाराष्ट्रात, आंबा म्हणजे केवळ फळ नाही तर एक भावना आहे. कोकण, रायगड, देवगड, रत्नागिरीच्या आंब्यांची चव अनुभवण्यासाठी लोक दरवर्षी आतुर असतात.
हीच गोड भावना अनुभवण्यासाठी येतोय "आंबा महोत्सव २०२५" — The PicnicMan आणि Shivar Agro Tourism यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.
मे १८ (रविवार) व मे २४ (शनिवार) रोजी, वाडा, जिल्हा पालघर येथील गोर्हे गावातल्या शिवार फार्म मध्ये हा उत्सव साजरा होणार आहे.
या दिवसभराच्या 'मँगोलिशियस' कार्यक्रमात आहेत –
🍛 स्वादिष्ट खाद्यपदार्थ: आंबा शीरा, पोहे, आमरस पुरी, काचंबर, छास आणि कैरी भेळसारख्या पारंपरिक ग्रामीण पदार्थांचा आस्वाद.
🎨 सांस्कृतिक आणि कलात्मक आनंद: वर्ली पेंटिंग, रॉक पेंटिंग, मातीची भांडी बनवण्याचे सत्र.
🚜 खेड्याचा अनुभव: बैलगाडी आणि ट्रॅक्टर सफर, मातीस्नान, रेन डान्स आणि रॉक पूल.
🎭 मनोरंजन: टारपा नृत्य, आंबा आईस्क्रीम, आणि शेवटी शॉपिंग.
"आंबा महोत्सव" म्हणजे केवळ एक सहल नाही.
तो आहे एक परंपरेशी जोडणारा, मातीशी नाळ जपणारा*अनुभव. आजच्या धावपळीच्या जीवनात, मुलांना गावाकडचा गंध, गावरान जेवणाची चव, मातीचा स्पर्श, बैलाच्या घंटांचा आवाज फारसे माहित नसतो. हा महोत्सव अशा प्रत्येक कुटुंबासाठी आहे जो आपल्या मुलांना खऱ्या आनंदाचा, खऱ्या भारताचा अनुभव द्यायचा आहे. इथे मोबाईल नाहीत, सोशल मीडियाचं आकर्षण नाही – इथे आहेत खऱ्या भावना, खऱ्या गप्पा, आणि खऱ्या गोड आठवणी!
चला, आपल्या लहानपणीच्या उन्हाळ्याचा गोडवा परत अनुभवूया… आंबा चाखूया, पाय मातीच्या ओलाव्यात भिजवूया, आणि मनातली काळजी बाजूला ठेवून एक दिवस ‘माणूस’ म्हणून जगूया...
गोड आठवणींचा गोडवा अनुभवायला नक्की या – आणि आयुष्यभरासाठी काही सुंदर क्षण गाठीशी बांधून घ्या!
मित्र-नातेवाईकांसह गोड आठवणी निर्माण करण्यासाठी हा दिवस खास ठरणार आहे. पारंपरिक जीवनशैलीचा अनुभव देणारा हा महोत्सव म्हणजे गोड आठवणींसह गोडवा अनुभवण्याची संधीच!
शुल्क: ₹२५०० प्रती व्यक्ती (४ वर्षाखालील मुलांना विनामूल्य प्रवेश)
जागा निश्चित करण्यासाठी आजच बुकिंग करा!
-The PicnicMan सुनील आव्हाड
आपला जुना मित्र, नव्याने आपल्या भेटीला!!!
📱 9819 89 17 72 | 9892 71 17 72
#TasteOfTradition #MangoMemories2025 #BackToRoots #FlavoursOfChildhood #MangoFestivalVada #SoulfulSummers







.jpg)
.jpg)
"शेतीमाती"
अन्नाच्या कृतज्ञतेची पेरणी!
एक अनोखं उन्हाळी शिबिर २०२५
आजची पिढी प्रगत तंत्रज्ञानाच्या सहवासात वाढते आहे. मोबाईल, मॉल्स, गेमिंग झोन आणि शाळांमधील बंदिस्त शिक्षणपद्धती यामध्ये लहान मुले अडकून पडली आहेत. खेळण्यासाठी मैदानं उरलेली नाहीत, झाडांची नावंही फक्त पाठ्यपुस्तकांमध्येच वाचली जातात. आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं – “मातीशी नातं” ही भावना मुलांमध्ये हरवू लागली आहे.
ज्या मातीतून अन्नाची निर्मिती होते. त्या मातीचा सुगंधही आज अनेक मुलांच्या आयुष्यात कधी पोहोचतच नाही. म्हणूनच ‘The PicnicMan’ सादर करत आहे – एक हृदयस्पर्शी, जीवनमूल्यांची शिकवण देणारं खास अनुभवशिबिर – "शेतीमाती"
🌾 मातीशी नातं – एक भावनिक पुनर्भेट
"शेतीमाती" हे केवळ उन्हाळी शिबिर नाही, तर एक संस्कारांचं शिबिर आहे. इथे मुलांना फक्त ‘शेत बघायला’ नेलं जात नाही, तर त्यांच्या हातात माती दिली जाते – बी पेरण्यासाठी, झाडं लावण्यासाठी, आणि निसर्गाशी एकरूप होण्यासाठी.
➡️ ते खऱ्या शेतकऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून राबतात,
➡️ माती, पाणी, बियाणं, पिकं यांचं खरंखुरं नातं समजून घेतात,
➡️ आणि शेतीच्या सुगंधात हरवून मुक्तपणे खेळतात, शिकतात, अनुभवतात.
या साऱ्या अनुभवातून त्यांच्या मनात कृतज्ञतेची बीजं पेरली जातात – अन्नासाठी, शेतकऱ्यांसाठी, आणि निसर्गासाठी.
आजच्या गॅजेटधारी, गतीशिल आयुष्यात या भावना हरवत चालल्या आहेत – पण "शेतीमाती" त्या पुन्हा रुजवते.
🌱 आपली मुलं शिबिरात काय शिकतील? – केवळ अभ्यास नव्हे, जीवनाचा अनुभव!!!
शेतीमाती शिबिरामध्ये मुलांना शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन अनुभवातून शिकण्याची संधी मिळते.
हातात माती, मनात ओलावा आणि चेहऱ्यावर आनंद – असं शिक्षण इथे दिलं जातं:
🌱 बी पेरणं व रोपांची लागवड – बीजांचं जगणं पाहताना मुलांचं मनही रुजतं.
🌱 शेतमजुरी, बैलजोडी, कुदळ-फावडं – ही केवळ औजारे नाहीत, तर कष्टाच्या संस्कारांची भाषा आहे.
🌱 पारंपरिक ग्रामीण जेवणाचा अनुभव – शेतकरी स्त्रियांच्या हातचं पोषण, स्वाद आणि प्रेम यांचा संगम.
🌱 रात्री गप्पा, गाणी, कलागुणांचं सादरीकरण – मुलांच्या आत्मविश्वासाला नवे पंख.
🌱 आकाशदर्शन, पक्षीनिरीक्षण, निसर्गफेरी – विज्ञान आणि सौंदर्य यांचा एकत्र अनुभव.
या सगळ्यातून मुलांचं मन मोकळं होतं, मनोभूमी समृद्ध होते आणि हळूहळू माणूसपण रुजतं.
🌱 "शेतीमाती" हे शिबिर म्हणजे आजच्या मुलांसाठी एक अमूल्य भेट आहे – शेती, निसर्ग, कष्ट आणि कृतज्ञतेचं नातं जोडणारी!
ही भेट फक्त काही दिवसांची मजा नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजणारा असा अनुभव आहे, जो आयुष्यभर त्यांच्या विचारांत, वागण्यात आणि जीवनदृष्टीत उमटत राहतो. शेतीच्या मोकळ्या वातावरणात, मातीच्या गंधात, मेहनतीच्या घामात आणि निसर्गाच्या कुशीत घालवलेले हे क्षण त्यांना जीवनाच्या खरीमुल्यांची ओळख करून देतात. शहरी जगण्यात हरवलेली माणुसकी, सहवेदना आणि निसर्गाशी असलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी – "शेतीमाती" हे शिबिर म्हणजे एक सुंदर आणि आवश्यक पाऊल आहे!
मुलांचा वयोगट: वय वर्षे 8 ते 15
कालावधी: शिबिर 1: 28,29,30 April 2025
शिबिर 2 : 19,20,21 May 2025
शिबिर शुल्क ८५००/- प्रती विद्यार्थी
-The PicnicMan सुनील आव्हाड
आपला जुना मित्र, नव्याने आपल्या भेटीला!!!
📱 9819 89 17 72 | 9892 71 17 72
#ShetiMati2025 #BackToRoots #KidsInNature #GratitudeThroughFarming #PicnicManExperience #RuralLearningForUrbanKids






About The PicnicMan - Sunil Avhad

Be it a weekend or a weekday, taking a break is all about spending quality time with your loved ones.
Whether it’s dining with your family, chilling with your buddies, playing with your kids, or sharing romantic moments with your special one — every break should be colourful, joyful, and memorable.
For days like these, everyone deserves a fun-loving, vibrant, and friendly travel companion...
That’s where comes in... The PicnicMan!.... Sunil Avhad...!
Your Best Friend and Picnic Organiser cum Guide...
We’ve been passionately active in the tourism industry for over 7 years, right from the heart of Kalyan city. We specialize in well-organized, delightful, and budget-friendly weekend or one-day picnics at beautiful, serene resorts and destinations near the city.So next time you think about spending a fun-filled weekend…
Take a break. Think of "The Picnic Man."
Our Values
Our Vision: To become one of the most trusted, reputed, affordable, and versatile travel partners for people from all walks of life.
Our Mission: To create and spread boundless joy by organizing energizing, colourful, cheerful, yet truly relaxing one-day picnics that gift people with unforgettable memories.
Our Goal: To deliver memorable travel experiences to 10,000+ happy travellers through The Picnic Man by 15th August 2028.
Our Values:
1. Strengthening Bonds That Truly Matter
In today’s fast-moving digital world, The PicnicMan brings families and friends closer – where parents laugh with children, grandparents share stories, and friends reconnect beyond screens. It's not just a picnic, it’s togetherness in its purest form.
2. A Celebration of Culture, Creativity & Passions
Be it folk arts, crafts, or nature-inspired hobbies – every PicnicMan event is a colorful canvas of real India. From Warli painting to playful activities, it’s a day where your inner child and cultural roots come alive, beautifully.
3. Discovering Hidden Gems Around You
Why travel far when wonder is just around the corner? From Wada to Karjat, Shahapur to Igatpuri – The PicnicMan takes you on unforgettable journeys to scenic and serene spots you never knew were so close.
4. Short Picnics Within Your Budget
No huge expenses, no long leaves – just one perfect day at a pocket-friendly price. The PicnicMan offers joyful escapes that don’t pinch your pocket but fill your heart.
5. Memories That Stay With You Forever
Some moments can't be described – only felt. The PicnicMan creates those magical, soulful experiences that leave behind not just photographs, but lifelong memories.
The PicnicMan — Because your heart deserves a day off too!
One day. One picnic. A lifetime of smiles.