आपला बिझनेस कट्टा
आम्ही OFFLINE असतो...आम्ही OFFLINE भेटतो...
आम्ही ONLINE देखील असतो...
आम्ही ONLINE देखील भेटतो...
आम्ही मिटिंग करतो, नेटवर्किंग करतो,
माणसं जोडतो आणि बिझनेस वाढवतो!!!
उद्योग☀ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा
चला ONLINE भेटुया…
परस्परांना 🔥 ऊर्जा देऊया!!!
आणि
कितीही व्यस्त, अस्वस्थ आणि बंदिस्त असलो तरीही
स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, बिनधास्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगुया...☺!!!
हे व्यासपीठ, हा कट्टा त्यांच्यासाठी आहे...
जे.स्वतंत्र व्यवसाय सुरु करू इच्छित आहेत...
स्वत:च्या व्यवसायात जिद्दीने धडपडत आहेत...
आपल्या व्यवसायात यशस्वीपणे स्थिरस्थावर झाले आहेत...
अशा सर्व क्षेत्रातल्या, सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांकरीता
< यशाची जबरदस्त जादू... आणि
सकारात्मक ऊर्जेचा उगम...!!! >
म्हणजे
"उद्योग☀ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा !!!
उद्योग... धंदा... व्यवसाय... पैसा... प्रसिद्धी... प्रेरणा... प्रोत्साहन... उत्साह... ऊर्जा... मैत्री... श्रीमंती... प्रगती... आणि बरंच काही... म्हणजे "उद्योग☀ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा
आपला व्यावसायिक दृष्टीकोन आमुलाग्र बदलून खऱ्या अर्थाने आपला व्यवसाय झपाट्याने वाढविण्याच्या दृष्टीने हा आमचा एक सकारात्मक प्रयत्न...! आणि आमच्या सोबत येणारा प्रत्येक व्यावसायिक आपापल्या व्यवसाय उद्योगात यशस्वी व्हावा, हा आमचा एकमेव प्रामाणिक हेतू आहे.
"उद्योग☀ऊर्जा"
हा आपला बिझनेस कट्टा आहे आणि ह्या व्यासपीठावर येत्या काळात आपण आपल्या व्यवसाय वृद्धीशी संबधित अनेक महत्त्वांच्या विषयावर अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत... माहितीचे आदानप्रदान करणार आहोत...
ONLINE / OFFLINE मुख्य मिटींग्सला उपस्थित राहणारे व्यावसायिक उद्योग उर्जाच्या ऑफिशियल ग्रुपवर येतात. मुख्य मिटींग् आणि WA ग्रुप सोबत व्यावसायिक १-२-१ आणि पोकेट मिटिंग माध्यमातून एकमेकांशी परिचय वाढवतात. WHATSAPP सोबतच संस्थेचा स्वत:चा APP आहे.... शिवाय FB ग्रुप, TELEGRAM, SIGNAL माध्यमातून व्यावसायिक एकमेकांना भेटत असतात. व्यावसायिक REFERENCES देत असतात.
२० ऑक्टोबर २०१८ साली डोंबिवली येथे २८ व्यावसायिकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पहिल्या कट्टा मिटिंग पासून आज ८६ व्या online कट्ट्यापर्यंत एकूण १००० पेक्षा अधिक डनडील्सच्या माध्यमातून तब्बल ३.५ करोड हून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे.
प्रमुख उद्देश्य
१. नवीन व्यवसायिक मित्र मिळविण्यासाठी...
२. परस्परांचे व्यवसाय व्यवस्थित समजून घेण्यासाठी...
३. परस्परांना प्रोत्साहित आणि उत्साहित करण्यासाठी...
४. सहकार्याने व्यवसाय वाढवण्यासाठी... आणि
५. नवीन व्यवसायिक मंत्र-तंत्र शिकण्यासाठी...
आपली प्रतिज्ञा
नमस्कार मित्रांनो
ही एक सुरुवात आहे... हा एक प्रारंभ आहे...
👉 हा प्रारंभ... एका विशिष्ट ध्येयाने... उद्देश्याने... प्रेरीत होऊन एकदिलाने एकत्र येण्याचा...
👉 हा प्रारंभ... आपल्या अंगभूत उर्जेचा सुयोग्य वापर करून आपल्या व्यवसायिक यशाचा आलेख अधिकाधिक उंचावण्याचा...
👉 हा प्रारंभ... आपल्या यशस्वी व्यावसायिक प्रवासाचा आणि आपली व्यावसायिक स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा...
👉 हा प्रारंभ...आपले पंख बळकट करून उंच भरारी घेण्याचा... आपल्या यशाच्या कक्षा अधिकाधिक रुंदावण्याचा...
👉 हा प्रारंभ... आपापल्या उद्योग व्यवसायात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि सक्षम होण्याचा...
👉 हा प्रारंभ... जात-धर्म-पंथ-भाषा-प्रांत विरहित "व्यावसायिकता" हा एकमेव धर्म जोपासण्याचा...
👉 हा प्रारंभ...सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रत्यक्ष सक्रिय होण्याचा... निराश मनाला आशेची फुंकर घालण्याचा... आनंद देण्याचा... नवसंजीवनी देण्याचा... नवचैतन्याचा...
👉 हा प्रारंभ... एकत्र येण्याचा... कारण एकत्र येणं ही 'सुरुवात' असते... एकत्र राहणं म्हणजे 'प्रगती' असते...आणि एकत्र काम करण्यात 'यश' असते... ह्यावर आमचा दृढ विश्वास आहे.
चला तर मग... एका नवीन यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया... एकत्र...!!!
चला भेटुया...
परस्परांना 🔥 ऊर्जा देऊया... आणि स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, बिनधास्त, भारदस्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगुया...☺!!!