व्यावसायिक मित्रांनो, आपण, आपले कुटुंबीय आणि आपला व्यवसाय खरंच सुरक्षित आहे का???
आजकाल ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढलेत… जसे की पासवर्ड चोरी, बँक अकाउंट हॅकिंग, सोशल मिडिया हॅक, फेक लिंक्स, डिजिटल अरेस्ट, OTP Scam, इत्यादी...
हे सगळं आता फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही, तर आपल्या सारख्या लहान मध्यम व्यावसायांनाही तितकंच धोकादायक आहे! तसेच आपली मुलं, जेष्ठ आई वडील, नातेवाईक सगळेच या फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. हल्लीच आपण वाचलं असेल की एका मराठी कलाकाराच्या बँकेतून 65 लाख 5 मिनिटांत गायब झाले.
म्हणूनच या गंभीर पार्श्वभूमीवर "उद्योगऊर्जा" घेऊन येत आहेत एक मोफत सायबर सुरक्षा कार्यशाळा – खास MSME उद्योजकांसाठी! Google.org, The Asia Foundation, ImmenseSoft यांच्या सहकार्याने...
सायबर-सुरक्षा जागृती कार्यशाळा
मोफत सहभाग नोंदणी सुरू!
पुणे व मुंबईमधील उद्योजकांसाठी
एक सर्वोत्तम सुरक्षा संधी!
🔒 कार्यशाळेचे मुख्य उद्देश्य
-
आपला व्यवसाय ऑनलाइन धोके व सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवणे.
-
सायबर सजगता वाढवणे आणि
-
डिजिटल सुरक्षितता सुनिश्चित करणे.
📘 प्रशिक्षणामध्ये समाविष्ट विषय:
१. सायबर हल्ल्यांचे प्रकार
२. सायबर सुरक्षा जागरूकता व सर्वोत्तम उपाय
३. सॉफ्टवेअर व सिस्टम सुरक्षा
४. ऑनलाइन खात्यांचे संरक्षण
५. स्मार्ट उपकरणांची (IoT) सुरक्षितता
६. व्यवसायाच्या सोशल मीडिया खात्यांची सुरक्षा
७. हॅकर्स पासवर्ड कसे चोरतात हे समजून घेणे
८. सॉफ्टवेअर अपडेट्सचे महत्त्व
९. मोफत Wi-Fi सुरक्षितपणे वापरण्याचे नियम
१०. फसव्या मेसेज व लिंक्स कशा ओळखाव्यात
११. कर्मचार्यांसाठी सायबर सुरक्षा उपाय
१२. ईमेल फसवणूक (Phishing) ओळखणे व टाळणे
१३. ऑनलाइन बँकिंग व UPI सुरक्षित वापरण्याचे मार्ग
१४. महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवणे व बॅकअप घेणे
१५. OTP व मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी खबरदारी
१६. सायबर गुन्हेगारी कुठे व कशी नोंदवायची (Reporting)
१७. बनावट अॅप्स व वेबसाइट्सपासून सावध राहणे
१८. महिला उद्योजिकांसाठी ऑनलाईन सुरक्षिततेचे मार्गदर्शन
१९. वर्क फ्रॉम होम करताना सायबर सुरक्षा राखणे
२०. सुरक्षित फाईल शेअरिंग व पासवर्ड व्यवस्थापन
![UU Member [LOGO] (35).jpg](https://static.wixstatic.com/media/a325d6_0e8b3fb5a8e24077a26e9fe134b505b3~mv2.jpg/v1/crop/x_0,y_2,w_2160,h_2156/fill/w_486,h_485,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,enc_avif,quality_auto/UU%20Member%20%5BLOGO%5D%20(35).jpg)
![UU Member [LOGO] (36).jpg](https://static.wixstatic.com/media/a325d6_bfa97ec4636c43fdb41b7497443a16e5~mv2.jpg/v1/crop/x_0,y_2,w_2160,h_2156/fill/w_486,h_485,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,enc_avif,quality_auto/UU%20Member%20%5BLOGO%5D%20(36).jpg)