https://www.facebook.com/Udyogurja/videos/466428754663285
"निलेश, आज मॅच नसती तर प्रदर्शनाला नक्कीच आलो असतो... नव्हे येणारच होतो... पण... मॅच पाकिस्तान विरुद्ध आहे... सो... प्लिज..."
किमान 10 ते 12 मित्रांचे या आशयाचे मेसेजेस व कॉल्स मला रविवारी संध्याकाळी पोहचले... आणि मी त्यांच्या देश प्रेमाच्या भावनेने खरंच धन्य धन्य झालो.
देशप्रेम, देशाभिमान, क्रिकेट वेड, भारत x पाकिस्तान क्रिकेट सामन्यातील उत्सुकता, जिंकण्याची ओढ, जिंकण्याचा आनंद हे सगळं एकाबाजुला जरी खरं असलं तरी आज लॉकडाऊन नंतर मात्र लहान-मध्यम व्यवसायिकांसमोर खुप वेगळेच प्रश्न उभे ठाकले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच सामना सुरू आहे... रोज वेगवेगळ्या चित्तथरारक पद्धतीने सुरू आहे. जगण्या-मरण्याच्या एका वेगळ्याच भयंकर लढाईला ते सध्या तोंड देत आहेत. भारत जिंकणार की हारणार??? हा त्यांच्यापुढचा प्रश्नच नाही किंबहुना त्याने त्याचे जगण्याचे, महागाईचे, मूलभूत सोयी सुविधांचे, शिक्षणाचे प्रश्नच उपस्थित करू नये म्हणुन हे सामने भरवले जातात का??? हा खरा प्रश्न आहे...
असो, भारत जरी रविवारचा पाकिस्तान सोबतचा सामना हरला असला तरी आम्ही मात्र जिंकलो आहोत. गेल्या आठवड्यात, शुक्रवार ते रविवार ३ दिवस सुरू असलेल्या "उद्योगऊर्जा - आपली व्यापारी पेठ" या ड्रीम बिझनेस प्रोजेक्ट मध्ये आम्ही सर्व जिंकलो आहोत... शिवाय तब्बल 50 व्यावसायिकांना जिंकण्यासाठी, स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा देण्यासाठी कारणीभूत झालो आहोत असं मला मनापासून वाटतं... रविवारचा हा भारत X पाकिस्तान सामना नसता तर कदाचित हा जिंकण्याचा आनंद अधिक द्विगुणित झाला असता यात शंकाच नाही.
अगदी मनापासून सांगायचं तर.. एक अनुभवी व्यवसायिक म्हणुन... लहान मध्यम व्यावसायिकांचा संघटक म्हणुन हे असे सामने मला अनेकदा त्रासदायक वाटतात... संपुर्ण देशाने आपली कामे बाजुला ठेऊन या सामन्यातील प्रत्येक चेंडू लक्षपूर्वक बघणं काही मूठभर लोकांना परवडत असेल पण देशातल्या 90 टक्के लोकांना हे कदापिही परवडणार नाही.
माझा कोणत्याही खेळाला देखील विरोध नाही पण एखादा खेळ जेंव्हा धंदा होतो (IPL) किंवा इतरांच्या धंद्यावर परिणाम करू शकतो (कालचा सामना) तेंव्हा नक्कीच काळजी वाटते.
तसेच आपल्या परिसरातील स्थानिक राजकिय नेते तसेच राजकीय पक्षांपासून ते अगदी देश पातळीवरील देशातील एकही राजकीय नेता/पक्ष हा सामान्य व्यावसायिकांच्या बाजूने नाही यावर माझा ठाम विश्वास आहे... मी स्वतः आणि उद्योगऊर्जा संस्था ही कायम लहान मध्यम व्यवसायिकांसोबत असणार आहे. देश पातळीवरील कोणत्याही भावनिक प्रश्नात/विषयांत (भारतx पाकिस्तान सामना वा इतर) अडकुन मी माझे आयुष्य वाया घालविणार नाही, माझा धंदा-व्यवसाय बुडवणार नाही... कारण लहान व्यवसायिक जगला तर देश जगणार आहे. यावर माझा विश्वास आहे. मी माझे देशप्रेम असे साजरे करतो. आणि याबद्दल मला अभिमान आहे. त्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची वा कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता वाटत नाही.
उद्योगऊर्जा - आपला बिझनेस कट्टा ही लहान-मध्यम (MSME) व्यवसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी एक आघाडीची संस्था आहे. दिवाळी आणि "उद्योगऊर्जा" संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त फराळ आणि गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन आम्ही केले होते. दि. २२, २३, २४ ऑक्टोबर या काळात बोडस सभागृह, डोंबिवली येथे हे प्रदर्शन संपन्न झाले.
उद्योगऊर्जा - आपला बिझनेस कट्टा - आपली ग्राहक पेठ!!!
आपल्या आसपासच्या अगदी लहान-मध्यम व्यावसायिकांनी कोविड-१९ आणि लॉकडाउन नंतरची नकारात्मक मरगळ झटकून त्यांना सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी... लॉकडाउन सारख्या भयंकर संकटानंतर पुनः नव्याने भरारी घेण्यासाठी.. त्यांना प्रोत्साहित आणि उत्साहित करण्यासाठी... सहकार्याने व्यवसाय वाढवण्यासाठी... लहान व्यावसायिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उद्योग ऊर्जा कटिबद्ध आहे आणि त्यासाठीच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
लहान व्यावसायिकांना वाचवणं, जगवणं, उभं राहायला हात देणं, जिंकायला साथ देणं, अडीअडचणीला सोबत करणं ही काळाची गरज आहे... कारण त्यांचा सामना वेगळाच आहे... त्याला प्रेक्षकही नाही, स्पॉन्सर देखील नाही आणि टाळ्या देखील नाहीत...
उद्योगऊर्जाचे सह संस्थापक मा. अभिजीत सरांच्या साथीने तृतीय वर्धापन दिनाचा एक सुंदर केक कापण्यात आला. नंतर दोन्ही सह-संस्थापकांनी व इतर मान्यवर लिडर्सनी आप्पापली मनोगते व्यक्त केली. त्यांनतर स्टॉल्स ना भेटी देण्यात आल्या. तेंव्हापासून रंगलेला हा प्रदर्शनातील ऊर्जेचा सोहळा - खरेदीचा मेळा तिसऱ्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत रंगला होता. 50 पैकी 8 स्टॉल्स ना विविध निकषांवर बक्षिसे देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजेंद्र पै यांच्या सुमधुर आवाजातील गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.
गेल्या ३ दिवसांत अंदाजे 1500 ते 1600 लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. आणि अंदाजे 2 लाख+ रुपयांची एकूण उलाढाल झाली.
असो, उद्योगउर्जा च्या पहिल्याच प्रयत्नावर विश्वास ठेवून प्रदर्शनात सहभागी झालेले मित्र नितीन सेठ (Answer Computers) व इतर सर्व नवे-जुने अनुभवी-उत्साही स्टॉल्सधारक यांचे आभार!!!
ज्यांच्या फक्त आसपास असण्यानेच ऊर्जा मिळते असे उद्योग उर्जाचे समस्त टॉप लिडर्स, इतर आवर्जून आलेले आपल्या सर्वांचे मित्र आणि हितचिंतक, भेट देऊन खरेदी करणारे ग्राहक, हॉल मालक व कॅटरर, तसेच डेकोरेटर्स यांचे विशेष आभार.
आऊटडोअर प्रमोशन आणि हॉल सजावटीसाठी जयप्रकाश कोकाटे यांची मोलाची साथ लाभली. उल्का मॅडम यांनी हॉल मॅनेजमेंट आणि अकाउंट्स सांभाळले. निगम, साहिल या तरुणांनी यांनी फोटोग्राफी आणि स्टॉल्स धारकांचे बाईट्स ही बाजू सांभाळली. तर नमिता दोंदे यांनी PR साठी मदत केली. लिडर दिपक राणे सर यांनी पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उत्तम संचलन केले. पुढारी दैनिकाच्या पत्रकार भाग्यश्री प्रधान यांनी शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमाचे संचालन केले.
तरुण व्यावसायिकांना लाजवेल असे उर्जादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले लाडके फ्लॉवर किंग अनंत काका... तीनही दिवस सकाळ पासून रात्रीपर्यंत उपस्थित असलेल्या अनंत काकांचे मनःपूर्वक आभार!!
विशेष कौतुक म्हणजे गेले 3 आठवडे दिवसरात्र राबणारी टीम उगमक्रीएटीव्हची यंग ब्रिगेड. यामध्ये आतिश, प्रणव, आदित्य, अंकिता, राजश्री, अंजली, अमिषा, अक्षय, रुपेश, सारिका, तृषाली यांचा समावेश आहे.
वर उल्लेख केलेल्या व न केलेल्या सर्वांचे मनापासून आभार, अभिनंदन आणि हार्दिक सदिच्छा!!!
प्रायोजक चित्रा राऊत (स्वानंद INVESTA), कौस्तुभ गद्रे ( Sparkle होम प्रोडक्टस) आणि दीपक महाले (केदार Enterprises) यांचे देखील विशेष आभार!!!!
खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस आपण सर्वांनीच जबरदस्त ऊर्जेचा सोहळा आणि खरेदीचा मेळा अनुभवला आहे... असे अवर्णनीय आनंददायी अनुभव पुन्हा पुनः घ्यायचे असतील तर उद्योगऊर्जा परिवारात सक्रिय व्हा... आणि आमच्यासोबत म्हणा... चला भेटुया, परस्परांना ऊर्जा देऊया!!!
धन्यवाद
BrandBond निलेश B+
सह-संस्थापक उद्योगऊर्जा आपला बिझनेस कट्टा https://tiny.one/BrandBond https://tiny.one/UgamCreative https://www.udyogurja.org
संपर्क क्रमांक - उद्योगऊर्जा 9224453677 https://wa.me/c/919224453677 उगमक्रिएटिव्ह 9920100308 https://wa.me/c/919920100308
Nice