आम्ही-OFFLINE असतो... आम्ही OFFLINE भेटतो…
आम्ही-ONLINE देखील असतो... आम्ही ONLINE देखील भेटतो…
आम्ही मिटिंग करतो, नेटवर्किंग करतो
माणसं जोडतो आणि बिझनेस वाढवतो!!!"
“उद्योग ऊर्जा - चला भेटूया परस्परांना ऊर्जा देऊया.”
व्यवसाय करताना आणि आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या निभावताना, परस्परांना भेटण्याचं वचन देत, परस्परांना ऊर्जा देत, आणि परस्परांचा व्यवसाय वाढवत ही उद्योगाची ऊर्जा गेली अनेक वर्षे अविरत कार्यरत आहे. ऊर्जेचा जन्म नसतो आणि तिला मरणही नसते,
ऊर्जा अक्षय असते. ऊर्जा देऊन ऊर्जा घेऊन केवळ तुमच्याकडची आमच्याकडे सुपूर्द होत असते.
२० ऑक्टोबर २०१८ रोजी उद्योजक आणि व्यावसायिकांतील ही ऊर्जा प्रसारित झाली आणि तिचे मूर्त स्वरूप नावापरूपास आले. "उद्योग ऊर्जा" हे यथार्थ नाव धारण करून डोंबिवली येथे २८ व्यावसायिकांच्या उपस्थितीमध्ये "उद्योग ऊर्जा - आपला बिझनेस कट्टा"ची पहिली व्यावसायिक कट्टा मिटिंग संपन्न झाली. त्यानंतर मात्र स्वःत:च्या दैदिप्यमान कीर्तीने प्रत्येक लहान मोठ्या व्यावसायिकाच्या हृदयात ह्याच उद्योग ऊर्जा संस्थेने तेजोमय स्थान मिळवलं आहे. आजवर नव्व्दहून अधिक व्यावसायिक कट्टे जमवत, नेटवर्किंग करत एकूण ११०० पेक्षा अधिक डनडील्सच्या माध्यमातून तब्बल साडेचार करोड हून अधिक रुपयांची उलाढाल आजवर झाली आहे. नुकत्याच ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या उद्योग ऊर्जा ग्राहक पेठेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद् मिळाला. हेच ते आपल्या ‘उद्योग ऊर्जा’ परिवाराचे यश आहे.
उद्योग ऊर्जा - आरंभ नवतेजपर्वाचा
"उद्योग ऊर्जा" हा मूलमंत्र छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देणारे "उद्योग ऊर्जा" संकल्पना, संघटक, आणि संस्थापक ह्यांची ओळख जादूमय आणि कलामय आहे.
यशाची जबरदस्त जादू अर्थात Magician अभिजीत (आंतरराष्ट्रीय जादूगार, प्रेरणादायी वक्ते, आर्थिक आणि व्यावसायिक सल्लागार) आणि
सकारात्मक ऊर्जेचा उगम अर्थात BrandBond निलेश B+
(क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक - उगमक्रिएटिव्ह डोंबिवली)
"उद्योग ऊर्जा" ही ह्या प्रचंड ऊर्जादायी माणसांच्या जिवंत क्रांतीची गोष्ट आहे.
"उद्योग ऊर्जा" हा आपला सर्वांचा बिझनेस कट्टा
"उद्योग ऊर्जा" हा आपला सर्वांचा बिझनेस कट्टा आहे आणि ह्या व्यासपीठावर विविध मिटिंगसच्या माध्यमातून गेल्या साडे तीन वर्षात आपण आपल्या व्यवसाय वृद्धीशी संबधित अनेक महत्त्वांच्या विषयावर अनेकदा सविस्तर चर्चा केली आहे, माहितीचे आदानप्रदान केले आहे. या कट्टयावर आत्तापर्यंत १०० हून अधिक तज्ञ व्यक्तींनी आपल्याला विविध विषयावर मार्गदर्शन केले आहे.
ONLINE / OFFLINE मुख्य मेगा मिटींग्सला उपस्थित राहणारे व्यावसायिक उद्योग उर्जाच्या ऑफिशियल ग्रुपवर येतात. मुख्य मिटींग् आणि WA ग्रुप सोबत व्यावसायिक १-२-१ आणि पोकेट मिटिंग माध्यमातून एकमेकांशी परिचय वाढवतात. WHATSAPP सोबतच संस्थेचा स्वत:चा APP आहे.... शिवाय FB ग्रुप, TELEGRAM, INSTAGRAM अशा विविध माध्यमातून व्यावसायिक एकमेकांना भेटतात आणि REFERENCES देत असतात.
नुकत्याच ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या "उद्योग ऊर्जा" ग्राहक पेठेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद् मिळाला. "उद्योग ऊर्जा" ची यशस्वी आणि तेजस्वी घोडदौड अशीच सुरु राहील आपणही ह्या प्रगतीचा भाग होऊ शकता. त्यासाठी आपला सहभाग आवर्जून नोंदवा. आपणही आजच "उद्योग ऊर्जा" फ्री मेंबर होऊन ह्या व्यावसायिक मंचाचे आजीवन सभासद व्हा.
Comments