SanvadSetu Counselling Sessions by UdyogUrja
व्यवसाय-उद्योग करताना लहान आणि मध्यम (MSME) उद्योजकांना भेडसावणाऱ्या 7 प्रमुख मानसिक समस्या!!!
✅ 1. "मी एकटाच का लढतोय?" — उद्योग सुरु करताना किंवा वाढवताना अनेकदा उद्योजकांना असं वाटतं की, सगळं काही मीच करतोय... माझ्या पाठीशी कोणीच नाही! कुटुंब, मित्र, नातेवाईक, समाज यांच्याकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही आणि हीच भावना त्यांना आतून खचवते.
✅ 2. "पैसे कुठून आणू?" — नवा प्रोडक्ट लॉन्च करायचा, मशीन घ्यायचं, मार्केटिंग करायचं, टीम ठेवायची... पण भांडवल कमी पडतंय. तेंव्हा त्यांना वाटतं — "हे सगळं करायचं आहे... पण पैसे कुठून आणू?" आणि याच आर्थिक दबावामुळे त्यांची झोप उडते, डोकं सतत विचारांत गुरफटतं.
✅ 3. "ग्राहक का कमी आहेत?" — सुरुवातीला छान चालतं... मग हळूहळू ग्राहक कमी होतात. तेव्हा उद्योजक विचार करतो — "माझं प्रोडक्ट चांगलं आहे, सर्व्हिस चांगली आहे... तरीही ग्राहक का येत नाहीत?" ही भावना त्याच्या आत्मविश्वासावर घाव घालते.
✅ 4. "लोक माझ्यावर हसत असतील का?" — मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी, समाज… सुरुवातीच्या काळात खूप अपेक्षा असतात. पण व्यवसाय थोडा अडखळतो, नुकसान होतं, संघर्ष वाढतो, तेव्हा लोक हसत असतील असं वाटतं. "तो बघा… उद्योग करतो म्हणतोय… पण धंदा काही चालत नाही!" ही भावना उद्योजकाला आतून पोखरते.
✅ 5. "मी चुकतोय का?" — सतत अपयश, ऑर्डर न मिळणं, पैसे अडकणं, मार्केटिंग फेल होणं, कर्मचारी सोडून जाणं… या सगळ्या घटनांमुळे उद्योजकाला वाटू लागतं — "मी काहीतरी चुकतोय का?" आणि याच विचारांमुळे त्याचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास डळमळतो.
✅ 6. "बिल कधी मिळणार?" — ग्राहक माल घेतात, काम करून घेतात… पण बिल मात्र वेळेवर मिळत नाही. उद्योजक सतत पैसे मागतोय, मागतोय… पण पैसे मिळत नाहीत. तेव्हा रात्रभर जागं राहून तो विचार करतो — "बिल कधी मिळणार?" आणि आर्थिक तणाव त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत राहतो.
✅ 7. "मी व्यवसाय बंद करावा का?" — अत्यंत खडतर काळात, जेव्हा व्यवसायात खूप मोठं नुकसान होतं, मागण्या थांबतात, मार्केटिंग फेल होतं… तेव्हा मनात एकच विचार येतो — "काय गरज आहे सगळ्याची? बंदच करावा का उद्योग?" आणि अशा वेळी उद्योजकाचे डोळे भरून येतात… स्वप्न तुटत असल्याचं जाणवतं… आणि मन हळहळत राहतं.
🤚 पण मित्रा, थांबू नकोस! 👩🏻💼👨🏻💼
🧠 तुझ्या मनात चालणारी ही मानसिक लढाईच तुझं यश ठरवते!
🏆 जो हार मानतो तो हरतो… जो टिकतो, शिकतो आणि लढतो तोच जिंकतो!
👉 उद्योजकाचं आयुष्य सोपं नसतं… पण ज्यांनी यश मिळवलंय तेही याच अडचणींवर मात करून मोठे झालेत!
✅ म्हणून… तू हार मानू नकोस!
✅ तू चालत रहा… लढत रहा… एक दिवस तुझ्या "यशाची गोष्ट" लिहिली जाईल!
💯🔥 तुम्हाला तुमच्या "यशाची गोष्ट" लिहायची असेल तर तुम्हाला आवश्यकता आहे एका सुंदर सकारात्मक संवादाची... समुपदेशनाची... आणि योग्य मानसिक आधाराची... त्यासाठी आजच संपर्क करा... आपल्या व्यावसायिक जीवनात शांतता, स्थिरता, आनंद आणि प्रगती करण्यासाठी ही संधी गमावू नका...
आजच आमच्याशी बोला...
"उद्योगऊर्जा - संवादसेतू" - व्यक्त व्हा, मुक्त व्हा!
सल्लागार: ब्रँडबाँड निलेश आणि
मुख्य मार्गदर्शक: अरुण सर (अरुणोदय)
लहान-मध्यम उद्योजकांसाठी… मनाच्या लढाईत जिंकण्यासाठी… नेहमीच तुमच्या सोबत...
"उद्योगऊर्जा - संवादसेतू" - व्यक्त व्हा, मुक्त व्हा! 💪🚀
कॉल बॅक लिंक: https://wa.link/zl2uax
थेट संपर्क: 8828 717 041 /89 8484 8222 (Sagar)
top of page
₹5,000.00 Regular Price
₹500.00Sale Price
bottom of page