आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अनेक व्यक्ती येत असतात... काही व्यक्ती असतात, काही वल्ली असतात... काही एककल्ली असतात... काही व्यक्ती आयुष्यात येतात तशाच सहज निघुनही जातात... काही लक्षात राहतात... काही फक्त लक्ष ठेवतात... काही विस्मरणात जातात... काही स्मरणात राहतात... व्यक्ती तशा प्रवृत्ती...
आपल्याला भेटणाऱ्यांपैकी खुप कमी "व्यक्ती" ह्या खऱ्या अर्थाने "व्यक्तिमत्व" असतात... ज्या पहिल्या भेटीतच आपल्यावर छाप पाडतात... प्रभाव टाकतात... अशा व्यक्ती आपल्या कायम लक्षात राहतात... तासा दोन तासांच्या भेटीत या व्यक्ती स्वतःला खुप सफाईदारपणे सादर करतात... आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू ते अगदी सुंदर पद्धतीने आपल्यासमोर मांडतात...
अशाच एका स्मार्ट उत्साही व्यक्तीची परवा संध्याकाळी 1-2-1 भेट झाली...
अर्थशास्त्रातील पदवी, कम्युनिकेशन आणि जर्नालिझममधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एमए पदवी अभ्यासक्रम पूर्ण.
पालक आणि मुलांशी प्रभावीपणे संवाद साधण्यास सक्षम. समुपदेशन क्षेत्रात सध्या एका जबरदस्त करिअरला सुरुवात, शिक्षण क्षेत्रातील अध्यापनाचा चांगला अनुभव. जीवनाबद्दल सकारात्मक आणि व्यावहारिक दृष्टीकोन असलेली ही व्यक्ती एक उत्कृष्ट व्यवस्थापक आणि लिडर सुद्धा आहे.
सक्रिय सकारात्मक वृत्ती, प्रचंड ऊर्जा, ज्ञान, कौशल्ये, आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात.
लोकांच्या जीवनात सुयोग्य बदल घडवून त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे. आतापर्यंत त्यांनी एक हजाराहून अधिक पालकत्व शिबिरे प्रभावीपणे घेतली आहेत.
ही व्यक्ती जगप्रसिद्ध "ग्राफोथेरपिस्ट" आणि "हस्ताक्षर विश्लेषक" आहे. तसेच युनायटेड स्टेट्समधील हँडरायटिंग युनिव्हर्सिटी इंटरनॅशनलमध्ये "अधिकृत मार्गदर्शक" आहे. त्यांच्या छंदांमध्ये नृत्य, अभिनय आणि वाचन यांचा समावेश असुन त्यांना सामाजिक कार्यात विशेष रस आहे.
मित्रांनो, या व्यक्तीचे नाव "ज्योत्स्ना अमेय साळवी," संस्थापक संचालक, R3 (R Cube) The Cosmic Mind LLP
ज्योत्स्ना ह्यांच्या संस्थेचे Brand Name जितके मोठे आहे तितकेच अर्थपूर्ण आहे. नावाची ब्रँड स्टोरी त्यांच्याकडुन ऐकण्यात एक वेगळाच आनंद मिळेल. आपल्या ब्रँडच्या, ब्रँड स्टोरीच्या, फिलॉसॉफीच्या, ब्रँड विझन, मिशन, गोल, values शी प्रचंड प्रामाणिक (आणि प्रेमात) असलेल्या ज्योत्स्ना मॅडम आपल्या कामाबद्दल अगदी भरभरून आणि आत्मीयतेने बोलतात. आणि फक्त एकतर्फी बोलत नाहीत तर समोरच्या व्यक्तीला देखील ऐकतात आणि समजुन घेतात.
"प्रत्येक घरात शिवबा जन्मतो, कारण आम्ही जिजाऊ घडवतो" असं त्या अतिशय अभिमानाने आणि आत्मविश्वासाने का म्हणतात हे त्यांच्याच तोंडून ऐकणे हा प्रत्येकासाठी नक्कीच एक स्फूर्तिदायी अनुभव ठरेल.
माणसं जोडण्याची, त्यांच्याशी बोलण्याची, त्यांना समजुन घेण्याची, त्यांना सल्ला-समुपदेशन करण्याची त्यांची मुळ नैसर्गिक आवड त्यांनी निवडलेlल्या व्यवसायाशी अगदी सुसंगत आहे. माझे क्लायंट/मित्र रोहेश संकपाळ Rohesh Sankpal यांच्या त्या भगिनी आहेत. रोहेश यांची पत्नी श्रद्धा Shradha Rohesh Sankpal यांनी मला ज्योत्स्नाशी ओळख करून दिल्याबद्दल आभार.
ज्योत्स्ना राष्ट्र सेवा दलाशी संबंधित आहेत. त्या माध्यमातून आपली सामाजिक कार्याची बांधिलकी त्या पुर्ण करतात. उद्योगऊर्जाच्या देखील सभासद झाल्या आहेत आणि भविष्यात इतर सभासदांना लीडरशिप ट्रेनिंग त्या घेणार आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांच्याशी लवकरात लवकर त्यांच्या आणि आपल्या सोयीने 1-2-1 मीटिंग करावी.
ज्योत्स्ना मॅडम, आपल्याला आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि दैदिप्यमान कारकिर्दीसाठी माझ्यातर्फे, टीम उगमक्रिएटिव्ह आणि उद्योगऊर्जा परिवारातर्फे हार्दिक सदिच्छा!!! All the Best
धन्यवाद!!!
आपला सर्वांचा मित्र आणि हितचिंतक
BrandBond निलेश B+
क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ
संचालक - उगमक्रिएटिव्ह
सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा!!!
सह-संस्थापक उद्योगऊर्जा आपला बिझनेस कट्टा
चला भेटुया, एकमेकांना उर्जा देऊया!!!
https://tiny.one/BrandBond
https://tiny.one/UgamCreative
35Vaibhavi Kadam, Sainath R Ausare and 33 others
2 comments
Like
Comment
Share
मनापासून आभार व्यक्त करते. एवढ्या सुंदर नि उत्कृष्टरित्या मला समजून घेऊन माझे विचार मांडले आहे. मला माहिती आहे कि आज समजला जिजाऊ ची खऱ्या अर्थाने गरज आहे नि त्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही आणि आपल्या सगळ्या व्यावसायिक मित्रांची साथ मला सुंदररित्या लाभणार आहे.
तुम्ही एवढ्या धडाडीने एवढे सुंदर काम करत आहेत, ते म्हणजे लोकांना ऐकून घेणे नि त्यानुसार त्यांना पुढच्या वाटचालीसाठी प्रेरित करणे. यासाठी तुमचे भरभरून कौतुक.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.